◾️नाव : मोहनदास करमचंद गांधी
◾️जन्म : 2 ऑक्टोबर 1869, पोरबंदर (गुजरात)
🔺 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो
◾️प्रभाव: लिओ टॉलस्टॉय, जॉन रस्किन, गोपाळ कृष्ण गोखले यांचा
◾️1891 साली इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवून भारतात परतले
◾️ भारतात गांधीजी प्रथम राजकोट व नंतर मुंबईत वकिली सुरु केली
◾️1893 साली दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला व आफ्रिकेला गेले
◾️त्यांना पीटरमारित्झबर्ग शहरात रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले व तेथेच कृष्णवर्णीय म्हणून अपमान झाला
◾️त्यांनी 1894 मध्ये नाताळ भारतीय कॉंग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना एका राजकीय पक्षात परावर्तित केले
◾️सत्याग्रहाचा उपयोग 1915 साली गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला
◾️1915 साली गांधी भारतात कायमचे आले दरम्यान गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते
🔺गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून गोखले यांना ओळखले जातात
◾️गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला
◾️ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी 1930 साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली
◾️गांधीजीना पहिले मोठे यश 1917 मध्ये चंपारण येथे मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत व योग्य मोबदला देत नसत
◾️1918 खेडामधील शेतसारा सत्याग्रहातही यश मिळाले
◾️खेडा आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ म्हणून करू लागले
📌 इंग्रजांशी वाटाघाटी सरदार पटेल यांनी केल्या दरम्यान कर रद्द केला
◾️ 1918 साली अहमदाबाद येथे गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी गांधींनी प्रथम उपोषण केले व प्लेग बोनस आणि वाढीव पगार देण्यात आला.
◾️एप्रिल 1919 सालच्या पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात संतापाची लाट उसळली
◾️1919 सालच्या खिलाफत चळवळीचे नेतृत्व गांधींनी केले
◾️1919 सालीच ब्रिटिशांना सहकार्य न करण्यासाठी देशभर असहकार चळवळ उभारली
◾️1922 साली चौरीचौरा येथील आंदोलकांनी 22 पोलिसांना जिवंत जाळल्याने असहकार चळवळ मागे घेतले
◾️असहकार चळवळ मागे घेतल्याने क्रांतिकारकांनी गांधीजींची साथ सोडली व HRA, HSRA सारख्या संघटना सुरु केल्या
◾️गांधी अटकेत असताना काँग्रेसमध्ये फूट पडून मोतीलाल नेहरू व CR दास यांनी 1923 साली "स्वराज्य पक्षाची" स्थापना केली तर दुसरा गट पटेल यांचा होता.
◾️ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.
◾️या समितीमध्ये एकपण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला.
📌युनियनिस्ट पार्टी, जस्टीस पार्टी व आंबेडकर समर्थक होते
◾️ गांधीजींनी 1928 च्या कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला
◾️भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे बजावण्यात आले
◾️गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला(1929 पर्यंत)
◾️ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि 31 डिसेंबर इ.स. 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला.
📌 हा दिवस कॉंग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला
◾️गांधींनी सविनय कायदेभंग सुरु केले त्यात मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह इ समावेश होता
◾️गांधीजींनी मग मार्च 1930 मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. 12 मार्चला अहमदाबाद साबरमतीतुन निघालेली यात्रा 6 एप्रिलला दांडीला पोहोचली
◾️दरम्यान सायमन कमिशनने आपले काम आटोपून मे 1930 मध्ये अहवाल सादर केला व गोलमेज परिषदेची शिफारस केली
◾️शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. 5 मार्च 1931 मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली
◾️इंग्लंड येथे 3 गोलमेज परिषदांचे आयोजन केले मात्र गांधीजी नाराज होते, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऐवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता
◾️गांधींच्या मते भारताबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार फक्त काँग्रेसलाच आहे म्हणून गांधी दुसऱ्या परिषदेतून परत आहे व पुन्हा आंदोलन 1934 पर्यंत सुरु ठेवले
◾️दरम्यान इंग्लंडलचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनॉल्ड यांनी ऑगस्ट 1932 साली जातीय निवडा घोषित केला त्यात दलितांना स्वतंत्र मतदारसंघ होता
◾️यावेळी गांधी येरवडा तुरुंगात होते, दलितांच्या मतदारसंघाला विरोध म्हणून 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरु केले,
📌4 दिवसांनी आंबेडकर यांनी गांधींना जीवदान म्हणून आपली मागणी मागे घेतली व 24 सप्टेंबर 1932 रोजी "पुणे करार", येरवडा करार, "Poona Act" राखीव जागांवर झाला
◾️गांधींनी दलितांसाठी 1932 साली अस्पुश्यता निवारण संघ सुरु केला त्याचे पहिले अध्यक्ष मदन मोहन मालवीय होते
◾️1934 साली गांधींनी काँग्रेसचा राजीनामा दिला तर पुन्हा 1936 साली प्रवेश केला
◾️1942 साली मुंबईच्या आझाद मैदानावरून छोडो भारत / चले जाव चळवळ सुरु केली
◾️1947 साली भारताची फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळत असताना गांधीजी बंगालमध्ये नौखाली येथे हिंदू - मुस्लिम दंगे शांत करण्यात व्यस्त होते.
◾️त्यांची हत्या दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गोळी मारून करण्यात आली
◾️मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते
📌गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना 15 नोव्हेंबर 1949 ला फाशी देण्यात आली.
🔺हत्येचे कारण, त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते
प्रमुख स्मारक : राजघाट
No comments:
Post a Comment