Saturday, January 23, 2021

नाती (Blood Relations)

'नाती' या प्रकारातील उदाहरणे सोडवितांना नाते दिलेल्या व्यक्तीच्या जागी स्वतः समजून इतर नाती आपल्या घरातील नातेवाईकांना मानून उदाहरणे सोडविल्यास उत्तरात अचूकता व वेळेची बचत होतेे.


A. आईचे नातलग माझे कोण ?
------------------------------------------------

------------------------------------------------
01) आईची बहीण = मावशी

02) आईचा वडील = आजोबा

03) आईचा भाऊ = मामा

04) आईचा दीर = काका

05) आईचा भाचा = मामेभाऊ

06) आईचे सासरे = आजोबा

07) आईचा पुतण्या = चुलत  भाऊ

08) आईचा पती = वडील

09) आईचा भावोजी = काका

10) आईची आई = आजी

11) आईची वहीनी = मामी

12) आईची जाऊ = काकी

13) आईची भाची = मामे बहीण

14) आईची सासू = आजी

15)आईची पुतणी = चुलत बहीण

16)आईची नणंद = आत्या

--------------------------------------------------
नमुना १)ला :- माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. तर तुझी आई माझी कोण ?
A) आत्या       B) मावशी     C)   मामी     D) काकी
[Nots :-  माझी आई व तुझे वडील बहीण - भाऊ म्हणून तुझी आई  माझ्या आईची वहिनी ही माझी मामी होय.

नमुना 2)रा  --- माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मिनाची आई ही माधुरीच्या आईची कोण ?
A) आत्या      B) बहीण      C) नणंद       D) वहिनी
[Note :- माधुरीची आई मीनाच्या वडिलांची बहीण म्हणून मिनाची आई माधुरीच्या आईची वहिनी (भावजय ) लागेल.]
------------------------------------------------
B. मी माझ्या नातलगांचा कोण ?
------------------------------------------------
------------------------------------------------
01) मी माझ्या मावस बहिणीचा = मावस भाऊ

02) मी माझ्या आई-वडिलांचा = मुलगा

03) मी माझ्या आजी-आजोबांचा = नातू

04) मी माझ्या काका-काकीचा = पुतण्या

05) मी माझ्या पुतण्याचा = काका

06) मी माझ्या वाहिनीचा = दीर

07) मी माझ्या मुला-मुलीचा = पिता

08) मी माझ्या सासू-सासऱ्यांचा = जावई

09) मी माझ्या मामे भावाचा = आते भाऊ

10) मी माझ्या मेहुणा-मेहुणीचा = भावोजी

11) मी माझ्या आते भावाचा = मामे भाऊ

12) मी माझ्या भाचा-भाचीचा = मामा

13) मी माझ्या पत्नीचा = पती

14) मी माझ्या मावशीचा = भाचा

15) मी माझ्या मामा- मामीचा = भाचा

16) मी माझ्या बहीण-भावाचा = भाऊ
------------------------------------------------
A】
उदा.1) सुहासची काकू ही उमेशची मामी आहे, तर उमेश सुहास चा कोण ?
१) मामे भाऊ              २) चुलत भाऊ 
३) आते भाऊ            ४) मावस भाऊ

2) जया अजयला म्हणाली, "तुझ्या वडिलांची मेहुणी ही माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून आहे." तर जया अजयची कोण ?
१) मावस बहीण         २)आते बहीण 
३) मामे बहीण           ४) बहीण

3)एका स्त्रीची ओळख करून देताना दामू अण्णा म्हणाले, "हिची आई, माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे." तर ती स्त्री दामू अण्णाची कोण ?
१)सून                     २) मुलगी  
३)बहीण                 ४) भाची
---------------------------------------------------------------------
उत्तर सूची :- 1 - ३,   2 - १,   3 - २
---------------------------------------------------------------------
नमुना 3 रा :- सुजाताला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे, तर समीरला बहिणी किती ?
१)2                        २)1 
३)4                        ४)3

[Note :- समीर सुजाताचा भाऊ  आहे. म्हणून सुजाताला धरून एकूण तीन बहिणी.]
--------------------------------------------------
B】
उदा.१) दीपाला सहा बहिणी आहेत. तर तिची  एक बहीण कल्पना ही एक शिक्षक आहे, तर कल्पनाला एकुण किती बहिनी आहेत ?
१)5                      २)6
३)7                      ४)8

२) निखिलला चार काका आहेत; तर मुंबईत राहणाऱ्या त्याच्या बोरीवलीतील काकाला भाऊ किती ?
१)6                      २)5
३)4                      ४)३

३) A ही B ची मुलगी आहे. C ही A ची आत्या आहे. D हा C चा एकुलता एक भाऊ आहे. तर C ही B ची कोण ?
१) नणंद                २) बहीण 
३) जाऊ                ४) भावजय

४) वरील माहिती नुसार D ही व्यक्ती B ची कोण ?
१)भाऊ                 २) पती  
३) दीर                  ४) भाऊजी
---------------------------------------------------------------------
उत्तर सूची :- १)2, २)3, ३)1, ४)2
-------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

राजर्षी शाहू महाराज

            समाज विभागाच्या महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले गेलेले कोल्हापूर. या कोल्हापूर शहरामध्ये माहेरघराचा पाय...